जेएनएन, मुंबई. Arvind Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अबकारी घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ईडीकडून अटक करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार चे अध्यक्ष शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांच्या एक्स अकाऊंटवरून आपली प्रतिक्रिया मांडली आहे. ते म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्यावर विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सींच्या प्रतिशोधात्मक गैरवापराचा तीव्र निषेध. भाजप सत्तेसाठी किती खोलवर जाणार हे या अटकेवरून दिसून येते. या असंवैधानिक कारवाई विरोधात ‘भारत’ एकजुटीने उभा आहे. तसेच पत्रकार परिषद घेऊन सुद्धा शरद पवार यांनी केजरीवाल यांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचे म्हटले आहे तर, त्यांनी मोदी सरकारवर टीका देखील केली आहे.
Strongly condemn the vindictive misuse of central agencies to target the opposition, especially as general elections loom. This arrest showcases the depth to which BJP will stoop for power. ‘INDIA’ stands united against this unconstitutional action against #ArvindKejriwal
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 21, 2024
लोकसभा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स एकाणूतवरून प्रतिक्रिया दिली की, विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात मतदारांना कमी लेखण्यासाठी भाजप सरकारच्या आदेशानुसार ईडीने केलेली ही आणखी एक राजकीय प्रेरित अटक आहे. आम्ही संवैधानिक लोकशाहीसाठी आमच्या लढ्यात लवचिक आणि एकजूट आहोत.
I stand in solidarity with @ArvindKejriwal ji. This is yet another politically motivated arrest by the ED at the behest of the BJP Government to suppress the voice of the opposition & undermine the electorate at large. We are resilient and united in our fight for constitutional…
— Supriya Sule (@supriya_sule) March 21, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटाचे नेते व शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांची अटक ही अहंकाराचा कहर आहे…. आज ही परिस्थिती असेल तर चुकून 2024 ला भाजप सत्तेत आली तर संविधान आणि लोकशाही हे सर्वांना विसरावं लागेल… या काळात मा. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत महाराष्ट्राचीही स्वाभिमानी मराठी जनता आहे…
या कारवाईवरुन मात्र एक स्पष्ट झालं की, भाजप घाबरलीय!.
दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांची अटक ही अहंकाराचा कहर आहे…. आज ही परिस्थिती असेल तर चुकून २०२४ ला भाजप सत्तेत आली तर संविधान आणि लोकशाही हे सर्वांना विसरावं लागेल…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 21, 2024
या काळात मा. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत महाराष्ट्राचीही स्वाभिमानी मराठी जनता आहे…
या कारवाईवरुन… pic.twitter.com/6kO9vgZVrl
