जेएनएन, मुंबई Makar Sankranti 2024: भारतात मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडविली जाते. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत पंतग उडविणे हा मजेशीर आणि महत्वाचा खेळ असतो. मकर संक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा असली तरीही भारतात जवळपास दीड ते दोन महिने पतंग उडविण्याची पद्धत आहे. मकर संक्रांति नंतर येणार प्रजासत्ताक दिनाला विविध नारे लिहिलेले पतंग ही उडविले जातात. भारतात बऱ्याच ठिकाणी पतंग महोत्सवाचे देखील आयोजन केले जाते. भारत पतंग उडविणे लोकप्रिय आहेच पण, तुम्हाला माहित आहे का? भारताव्यतिरिक्त कोणत्या देशांमध्ये पतंग उडविल्या जाते. चला तर मग जाणून घेऊया या कोणत्या देशांमध्ये पतंग उडविल्या जाते.
चीन
चीनसारख्या देशांमध्ये ही शुभ- अशुभ अश्या मान्यतांबरोबरच पतंग उडविण्याचा इतिहास आहे. असे सांगितले जाते की, चीनमध्ये किन राजाच्या राजवटीत पतंग उडवणे आणि तो बेवारसपणे फेकून देणे चुकीचे समजले जाते. तसेच एखाद्यायाचा पतंग कापणे व कटलेला पतंग उचलणे देखील अशुभ मानले जाते. या सर्व मान्यता मानत चीनमध्ये पतंग उडविली जाते.
थायलंड
थायलंडमध्ये मात्र धार्मिक मान्यतेनुसार पतंग उडविली जाते. असे सांगितले जाते की, येथे प्रत्येक राजाकडे स्वतःचा एक खास पतंग होता. जो देशात शांतता आणि समृद्धी आणण्याच्या उद्देशाने हिवाळ्याच्या हंगामात भिक्षू व पुरोहित हे पतंग उडवीत असत. थायलंडमधील लोक पावसाळ्यात देवाला प्रार्थना करण्यासाठी पतंग उडवत असल्याचेही सांगितले जाते. जगातील अनेक देशांमध्ये 27 नोव्हेंबर हा फ्लाई काइट डे म्हणून साजरा केला जातो.
युरोप
युरोपमध्ये खलाशी मार्को पोलोच्या आगमनानंतर पतंग उडवण्याची प्रथा सुरू झाली. मार्कोने पूर्वेकडील प्रवासादरम्यान आत्मसात केलेले पतंग कौशल्य युरोपमध्ये आणले. असे मानले जाते की, त्यानंतर युरोपमधील लोक आणि नंतर अमेरिकेतील रहिवाशांनी वैज्ञानिक आणि लष्करी हेतू पूर्ण करण्यासाठी पतंगांचा वापर केला. पतंग पाहिल्यानंतर मनात उडण्याची जी इच्छा निर्माण झाली त्यामुळेच माणसाला विमानाचा शोध लावण्याची प्रेरणा मिळाली असावी असेही म्हटले जाते.
आशिया
आशियाई देशांमध्ये पतंग उडवणे लोकप्रिय आहे. येथे फायटर पतंग उडविणे अधिक लोकप्रिय आहे. आशियामध्ये फायटर पतंग सामान्यतः कागद आणि बांबूपासून बनविलेले लहान, सपाट हिऱ्याच्या आकाराचे असतात. फायटर पतंगाला शेवटचा मोकळा भाग (शेपटी) वापरल्या जात नाही.
अफगाणिस्तान
अफगाणिस्तानमध्ये, पतंग उडवणे हा खेळ गुडीपारन बाजी म्हणून ओळखला जातो. याठिकाणी विशिष्ट प्रकारचे साहित्य वापरून पतंग बनविल्या जात असल्याचे सांगितले जाते. आता मात्र अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीत, इतर विविध मनोरंजनांबरोबरच पतंग उडवण्यावर बंदी घालण्यात आली होती.
पाकिस्तान
पाकिस्तानमध्ये, पतंगबाजीला गुढी-बाजी किंवा पतंग-बाजी म्हणून ओळखले जाते. जश्न-ए-बहारान (साहित्य. वसंतोत्सव) बसंत म्हणून ओळखल्या जाणार्या उत्सवासाठी पतंग प्रथा इथे आहे. असे असले तरीही पाकिस्तानात वर्षभर पतंग उडवले जातात.
इंडोनेशिया
येथे सर्वात लोकप्रिय पतंग प्रकारांपैकी एक म्हणजे बालिनी पतंग. या बालिनी पतंगवार पक्षी, फुलपाखरे, ड्रॅगन, जहाजे इ. चे चित्र असतात. तसेच व्हिएतनाममध्ये पतंग शेपटी शिवाय उडवले जातात. त्याऐवजी पतंगील लहान बासरी जोडल्या जाते. ज्यामुळे वारा एक संगीतमय ट्यून करतो. ध्वनी निर्माण करणार्या पतंगांचे इतर प्रकार आहेत.
नेपाळ
नेपाळमध्येही पतंग लोकप्रिय आहेत. विशेषतः डोंगराळ भागात आणि पहाडी आणि नेवार समुदायांमध्ये, जरी तराई भागात लोक पतंग उडवतात. भारताच्या विपरीत, नेपाळमधील लोक ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत पतंग उडवतात. पतंग उडविणे दशाईच्या वेळी अधिक लोकप्रिय असतात.
