जेएनएन, मुंबई. Weather Updates Today: गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्यात उन्हाचा वाढलेला तडाखा पाहायला मिळत आहे. अशा परिस्थिती हवामान विभागाच्या वतीने उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला असून, पुढील तीन ते चार दिवसात वातावरण उष्ण व दमट राहणार असून, त्यांनतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्याची एक चक्रीय स्थिती मराठवाडा व लगेतच्या भागावर असून, आज 4 एप्रिल रोजी व उद्या 5 एप्रिल रोजी कोकण, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, सहा व सात एप्रिल रोजी मराठवाड्यातील नांदेड व लातूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याने वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.
धाराशिव मध्ये 6,7 व 8 मे रोजी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दिनांक 6,7 व 8 मे रोजी विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया व यवतमाळ मध्ये तर 8 मे रोजी भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहण्याचा अंदाज असून, त्यामुळे या जिल्ह्यांना तीनही दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे व लगतच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील हवामान
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील सर्व जिल्हे कोरडे असण्याची शक्यता असून, त्यांनतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच ६ ते ७ तारखेला विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये वीज मेघगर्जनासह सोसाट्याच्या वारा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
