जेएनएन, मुंबई. Todays Weather Updates: महाराष्ट्रात सध्या उन्ह आणि पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावल्या नंतर आता कुठे नागरिकांना या अवकाळी पावसापासून सुटका मिळताना दिसत आहे. अश्यातच हवामान विभागाच्या वतीने राज्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज म्हणजेच 29 एप्रिल रोजी ड्रॉप किंवा बिल्डीस कंटिन्यूटी म्हणजे द्रोणीका रेषा मध्य विदर्भ म्हणून ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत मराठवाड्यातून जात आहे.  त्यामुळे मराठवाडा व विदर्भामध्ये आज तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. 

तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार-पाच दिवस तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता असून, आज म्हणजेच 29 एप्रिल  ठाणे,  मुंबई व रायगड येथे आज तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाडा, सांगली व सोलापूर, नांदेड, नाशिक येथे काही ठिकाणी आज रात्री उकाळा जाणवण्याची शक्यता  हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. 

तसेच  हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच मराठवाडा व विदर्भामध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.