जेएनएन, मुंबई. Weather Updates: ऐन उन्हाळ्यात संपूर्ण राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशारा नुसार आणखी काही दिवस विदर्भ आणि संपूर्ण राज्यभरात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच हवामान विभागाच्या वतीने विदर्भासाठी येल्लो अलर्ट देखील दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 25 आणि 26 एप्रिल रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट तसेच काही जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस देखील झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, कोकण व गोवा वगळता पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये 27 व 28 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. 

विदर्भातील तापमानाची स्थिती दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून, रात्री पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच तापमान 40 अंशापर्यंत राहणाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वर्धा जिल्यात पावसाच्या शक्यतेसह तापमान 41 अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाच्या शक्यतेनुसार तापमान 40 अंशापर्यंत राहणार,  चंद्रपूर जिल्ह्यात तापमान 41 अंश सेल्सियस, गोंदिया जिल्ह्यात 39 अंश सेल्सियस तसेच गडचिरोली जिल्ह्यात 42 अंश पर्यंत राहणार असून, विदर्भातील या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.