जेएनएन, मुंबई: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई उत्तर मतदारसंघ, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ, मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ, मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील एकूण 87 उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मुंबई उत्तर मतदारसंघात 19 उमेदवार असून, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात 21 उमेदवार रिंगणात असून, मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात 20 तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मुंबई उत्तर मतदारसंघात 19 उमेदवार रिंगणात असून, उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नाव, पक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : पीयूष गोयल (भारतीय जनता पार्टी, कमळ), भूषण पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस, हात), रईस डॉक्टर (बहुजन समाज पार्टी, हत्ती), अलिक सुंदर मेश्राम (भारतीय मूलनिवासी आजाद पार्टी, हंडी), कमलेश डाह्याभाई व्यास (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी, शिट्टी), कॉम्रेड जयराम विश्वकर्मा (सोशॅलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट, बॅटरी टॉर्च), जयेंद्र वसंत सुर्वे (भारतीय जवान किसान पार्टी, भेटवस्तू), दीपाली भवरसिंग शेखावत (महाराष्ट्र विकास आघाडी, रोड रोलर), बिपिन बच्चूभाई शाह (हिंदू समाज पार्टी, ऑटो रिक्षा), रवी बाबू गवळी (समता पार्टी, नागरिक), सय्यद जुल्फिकार आलम (बहुजन महा पार्टी, दूरदर्शन), ॲड. सोनल दिवाकर गोंडाणे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), ॲड. कपिल कां. सोनी (अपक्ष, सीसीटीव्ही कॅमेरा), गुरुदास रामदास खैरनार (अपक्ष, शिवणयंत्र), दीप्ती अशोक वालावलकर (अपक्ष, ऊस शेतकरी), पांडे धर्मेंद्र राममुरत (अपक्ष, बॅट), मुन्नालाल गजराज प्रजापती (अपक्ष, खाट), लक्ष्मण यल्लपा कुराडे (अपक्ष, प्रेशर कुकर), संजय मफतलाल मोरखिया (अपक्ष, कॅमेरा).

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात  21 उमेदवार रिंगणात असून, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नाव, पक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : अमोल गजानन कीर्तिकर (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मशाल), रवींद्र दत्ताराम वायकर (शिवसेना, धनुष्यबाण), राजेश रामकिसन मल्लाह (बहुजन समाज पक्ष, हत्ती), अरोरा सुरिंदर मोहन (भारत जनआधार पार्टी, कारंजा), परमेश्वर अशोक रणशूर (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), बाला वेंकटेश विनायक नाडर (आपकी अपनी पार्टी (पीपल्स) बॅटरी टॉर्च), भरत खिमजी शाह (हिंदू समाज पार्टी, ऑटो रिक्षा), मनोज श्रावण नायक (राइट टू रिकॉल पार्टी, प्रेशर कुकर), ॲड. मितेश वर्ष्णेय (भीमसेना, बासरी), सारिका डब्राल (इंडिया ग्रीन्स पार्टी, सफरचंद), हरिशंकर यादव (समाजविकास क्रांती पार्टी, विजेचा खांब), ॲडव्होकेट कपिल कांतिलाल सोनी (अपक्ष, सीसीटीव्ही कॅमेरा), गजानन तुकाराम सोनकांबळे (अपक्ष, पाटी), रोहन साठोणे (अपक्ष, माईक), ॲड. लता पांडुरंग शिंदे (अपक्ष, टंकलेखन यंत्र), समीर मोरे (अपक्ष, भालाफेक), सुनील भिमा चव्हाण (अपक्ष, जहाज), सुषमा दयानंद मेहता (अपक्ष, खाट), ॲड. संजीवकुमार अप्पाराव कलकोरी (अपक्ष, शिट्टी), संतोष माणिक रायबान (अपक्ष, ट्रक), ह्दा धनंजय शिंदे (अपक्ष, पेनाची निब सात किरणांसह).

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नाव, पक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : नंदेश विठ्ठल उमप (पक्ष – बहुजन समाज पार्टी, चिन्ह – हत्ती) , मिहिर चंद्रकांत कोटेचा (भारतीय जनता पार्टी, कमळ), संजय दिना पाटील (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मशाल), संजय ब. पाटील (नॅशनल पीपल्स पार्टी, पुस्तक), दत्तात्रय अर्जुन उतेकर (भारतीय जवान किसान पार्टी, भेटवस्तू), दौलत कादर खान (वंचित बहुजन आघाडी, एअर कंडिशनर), प्रो. डॉ. प्रशांत गंगावणे (देश जनहित पार्टी, प्रेशर कुकर), भवानी चौधरी (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी, शिट्टी), भूपिंदर सिंह सैनी (विरो के विर इंडियन पार्टी, हिरा), मोहम्मद अरमान मोहम्मद वसि खान (राष्ट्रीय जनहित संघर्ष पार्टी, कोट), कॉम्रेड सुरेंद्र सिबाग (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, सिंह), संजय सावजी देशपांडे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, कॅरम बोर्ड), संजू मारूती पवार (महाराष्ट्र विकास आघाडी, गॅस सिलेंडर), प्रेम रमापती गुप्ता (अपक्ष, खाट), बनसोडे दिलीप (अपक्ष, कपाट), मोहम्मद अहमद शेख (अपक्ष, अंगठी), विद्या नाईक (अपक्ष, खिडकी), शहाजी नानाजी थोरात (अपक्ष, काडेपेटी), डॉ.सुषमा मौर्य (अपक्ष, बॅटरी चार्ज), संजय पाटील (अपक्ष, सफरचंद) असे आहेत.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात 27 उमेदवार रिंगणात असून, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नाव, पक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : अयुब अमीन हुनगुंद (बहुजन समाज पार्टी, हत्ती), ॲड. उज्वल निकम (भारतीय जनता पार्टी, कमळ), गायकवाड वर्षा एकनाथ (इंडियन नॅशनल काँग्रेस, हात), ॲन्सन थॉमस (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर, द्राक्षे), कुर्बान शहादत हुसेन (राष्ट्रीय ओलमा कौन्सिल, बॅट), खान अब्बास अहमद (बहुजन महा पार्टी, शिट्टी), डॉ. (ॲड.) यशवंत रामभाऊ कसबे (भारतीय जनविकास आघाडी, कोट), रमजान अली चौधरी (ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन, पंतग), शौकत अब्दुल रफीक खान (इन्सानियत पार्टी, ऑटो रिक्षा), संतोष गणपत अंबुलगे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), हयात्तुल्लाह अब्दुल्लाह शेख (अखिल भारतीय मुस्लिम लीग सेक्युलर, बॅटरी टॉर्च), हर्षदा बाबूराव जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी, रोड रोलर), अब्दुल ताहीर ॲडव्होकेट (बबलू रजनीकांत, अपक्ष, काडेपेटी), ॲड. असिफ अली सिद्दीकी (अपक्ष, जहाज), ॲड. उत्तमकुमार नकुल सजनी साहू (अपक्ष, बासरी), इजाज मोहम्मद सफी खान (अपक्ष, डंबेल्स), डॉ. गफ्फार इब्राहिम सय्यद (अपक्ष, स्टेथोस्कोप), नजमाखतून मोहम्मद जफर खान (अपक्ष, कॅमेरा), नरेंद्र मिश्रा (अपक्ष, सफरचंद), ॲड. फिरोज शेख (अपक्ष, स्पॅनर), मुझाफर अली शेख (अपक्ष, चालण्याची काठी), मुश्ताक हैदर शेख (अपक्ष, हिरा), युनूसअली रशीद मुल्ला (अपक्ष, दूरध्वनी), रमा अरुण साबळे (अपक्ष, नागरिक), राजेश मोहन लोखंडे (अपक्ष, खाट), शांताराम स. दिघे (अपक्ष, प्रेशर कुकर), संदीप (भाऊ) रामचंद्र जाधव (अपक्ष, पेनाची निब, सात किरणांसह).