जेएनएन, मुंबई: राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील निवडणूका येत्या 20 मे रोजी पार पडणार असून, पाचव्या टप्प्यात होणाऱ्या 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मतदार संघातील उमेदवारांच्या छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
पाचव्या टप्प्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या जाहीर करण्यात आली असून, धुळे लोकसभा मतदारसंघात 18, दिंडोरी – 10, नाशिक – 31, पालघर – 10, भिवंडी – 27, कल्याण – 28, ठाणे – 24, मुंबई उत्तर – 19, मुंबई उत्तर पश्चिम – 21, मुंबई उत्तर पूर्व – 20, मुंबई उत्तर मध्य – 27, मुंबई दक्षिण मध्य – 15 आणि मुंबई दक्षिण – 14 उमेदवार आहेत. या 13 मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.
राज्यातील पाच टप्प्यातल्या निवडणूकाच वेळापत्रक:
पहिल्या टप्पा 19 एप्रिल गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक 5 मतदार संघ.
दुसऱ्या टप्पा 26 एप्रिल 2024 बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 मतदार संघ.
तिसरा टप्पा 7 मे 2024 रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदार संघ.
चौथा टप्पा 13 मे 2024 अहमदनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ. संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर या मतदारसंघात निवडणूक होणार आहेत.
पाचवा टप्पा 20 मे 2024 धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई या मतदार संघ.
