मुंबई, जेएनएन. Ethiopia New Year: नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत. प्रत्येक देशात तेथील पंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. २०२३ हे वर्ष संपून काहीच दिवसात नवीन वर्ष म्हणजेच २०२४ या वर्षाचे स्वागत केले जाईल. पण तुम्हाला माहित आहे का ? जगात एक असाही देश आहे जिथे नवीन वर्षाचे स्वागत आता केले जाणार नाही. इथोपिया या आफ्रिकी देशात नवीन वर्षाचे स्वागत ७ वर्षांनी केले जाईल. जाणून घेऊया या आफ्रिकी देश इथोपियाबद्दल.

या देशातील कॅलेंडर इतर देशातील कॅलेंडर पेक्षा वेगळे आहे. सर्व देशातील कॅलेंडरमध्ये एका वर्षात १२ महिने असतात परंतु, इथोपिया या देशाच्या कॅलेंडरमध्ये एका वर्षात १३ महिने असतात. यामुळे हा देश इतर देशांपेक्षा ७ वर्षे मागे आहे.   या देशात नवीन वर्ष १ जानेवारी ऐवजी ११ सप्टेंबरला दर १३ महिन्यांनी साजरे केले जाते.

इथोपिया या देशात इथोपियान हे कॅलेंडर वापरले जाते तर इतर देशांमध्ये  ग्रेगोरियन कॅलेंडर  वापरले जाते.  ग्रेगोरियन कॅलेंडरला 1582 मध्ये सुरू झाले. कॅथोलिक चर्चला मानणाऱ्या देशांनी नवीन कॅलेंडर स्वीकारले. अनेक देश याला विरोध करत होते यात इथिओपिया हा देशही होता. इथिओपियन कॅलेंडरमध्ये 13 महिने असतात. 12 महिन्यात 30 दिवस असतात तर शेवटच्या १३ व्या महिन्यात पाच ते सहा दिवस असतात ज्याला  Pagyume महिना असे म्हणतात. या देशात आता २०१६ हे वर्ष सुरु असेल आणि ११ सप्टेंबर रोजी हा देश त्यांचे नवीन वर्ष २०२४ साजरे करेल. 

इथोपिया या देशाविषयी 

इथिओपिया या देशात  युनेस्को  जागतिक वारसा स्थळांमधील सर्वाधिक ठिकाणांचा समावेश आहे. या देशात नैसर्गिक सौंदर्याचा खजिना असून, आफ्रिकेतील सर्वात जुना देश इथोपिया आहे.  या देशात ८० प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. 1960 च्या रोम समर ऑलिम्पिकमध्ये अबेबे बिकिला हे ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारे पहिले आफ्रिकन इथिओपियन मॅरेथॉन धावपटू होते.