जेएनएन, मुंबई. New Year Timings: वर्ष २०२३ संपून नवीन वर्ष सुरु होण्यास अगदी थोडेच दिवस शिल्लक आहे. जगभरात नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. प्रत्येक देशात तेथील परंपरानुसार नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जाते. येणार वर्ष आपल्या आयुष्यात आनंद, सुख-समृद्धी घेऊन यावे म्हणून या दिवशी आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का ? संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचे स्वागत एकाच वेळी केले जात नाही. वेगवेगळ्या देशात वेळेच्या अंतराने नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या देशात सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आणि पापुआ न्यू गिनी या ओशोनिया खंडातील देशांमध्ये सर्वातआधी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. किरितीमाती बेटांवर सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. याठिकाणी नवीन वर्षाची सुरवात होते तेव्हा भारतात ३१ डिसेंबरची दुपार झालेली असते. तसेच भारतातील म्हणजेच दुपारी 3:45 वाजता न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.

सर्वात शेवटी नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्या देशांमध्ये हॉलँड आणि बेकर या बेटांचा समावेश होतो. या बेटांवर नवीन वर्षाचे स्वागत होते तेव्हा भारतात संध्याकाळ झालेली असते.

नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येक देशात वेगवेगळ्या वेळी केले जाते. भारतात मध्यरात्री १२ वाजता नवीन वर्ष सुरु होते पण इतर देशातही नवीन वर्ष साजरे करण्याची हेच वेळ आहे का? प्रत्येक देशाच्या वेळेत थोडाफार बदल होत असतो. चला तर जाणून घेऊया इतर देशांमध्ये नवीन वर्ष साजरे करण्याची कोणती वेळ आहे. जागतिक तसे भारतीय प्रमाणवेळेनुसार नवीन वर्ष 2024 सुरु होण्याची वेळ:

31 डिसेंबर भारतीय वेळेनुसार

न्यूझीलंड: दुपारी 3:30 वा भारतीय वेळेनुसार

ऑस्ट्रेलिया: संध्याकाळी 6.30 वा भारतीय वेळेनुसार

जपान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया: रात्री 8:30 वा भारतीय वेळेनुसार

    चीन, फिलीपिन्स आणि सिंगापूर: रात्री 9:30वा भारतीय वेळेनुसार

    बांगलादेश: रात्री 11:30 वा भारतीय वेळेनुसार

    नेपाळ: 11:45 वा भारतीय वेळेनुसार

    भारत आणि श्रीलंका: 12:00 AM भारतीय वेळेनुसार

    पाकिस्तान: संध्याकाळी  12:30 वा भारतीय वेळेनुसार

    जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम आणि स्पेन: पहाटे 4:30 वा भारतीय वेळेनुसार

    UK, आयर्लंड, आइसलँड, पोर्तुगाल: पहाटे 5:30 वा भारतीय वेळेनुसार