जेएनएन, मुंबई. Women's Day 2024: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) महिलांसाठी विविध उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी येणाऱ्या जगभरातील महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एमटीडीसीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एमटीडीसी हे भारतातील एकमेव पर्यटन महामंडळ आहे की जे ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण प्रथम अंमलात आणुन महिलांचे पर्यटनात योगदान वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे.
याच उपक्रमाअंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) च्या वतीने ‘आई’ धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे 8 दिवस, आणि 1 ते 6 जून 2024, 1 ते 5 ऑगस्ट 2024 व 1 ते 5 ऑक्टोबर 2024 असे वर्षातील इतर 22 दिवस असे एकूण 30 दिवस महिलांकरिता महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50% इतकी सूट देण्यात आली आहे.
महिला करत असलेल्या कामाला तसेच त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने एमटीडीसी कडून हेरीटेज वॅाक, अनुभवात्मक पर्यटन (Experiential Tourism), शैक्षणिक सहल, 1 व 2 दिवसीय टुर्ससाठी महिलांना पर्यटक मार्गदर्शक (Tour guide) म्हणून संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच जल पर्यटनासाठी महिला प्रशिक्षक तर पर्यटनाच्या क्षेत्रात सर्व टुर्स हे प्रशिक्षित महिलांमार्फत राबवित आहे. या टुर्समध्ये क्युरेर्टस, गाईड महिला असणार आहे. एमटीडीसी मालमत्तेच्या ठिकाणी महिला बचत गटांना विविध स्टॉल्ससाठी जागा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य आहे. विशेष खेळ व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन पाच वर्षांपर्यंतची मुले असलेल्या महिला पर्यटकांसाठी पाळणाघर, या आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने सर्व उपक्रम महिलांना पर्वणी ठरतील. या उपक्रमामुळे एकट्या महिला प्रवासी (solo women traveler) व महिला ग्रुप टूर यांना पर्यटनासाठी वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नोंदवला जाईल आणि महिला पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.
एमटीडीसी हे भारतातील एकमेव पर्यटन महामंडळ आहे. जे ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण प्रथम अंमलात आणुन महिलांचे पर्यटनात योगदान वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे. ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत महिलांसाठी महामंडळामार्फत पोषक वातावरण पर्यटन सचिव, जयश्री भोज व व्यवस्थापकीय संचालक, मपविम, श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण अंतर्गत महिलांसाठी विविध उपक्रम पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.
By: Edited By: Ankur BorkarPublish Date: Fri 08 Mar 2024 01:37:00 PM (IST)Updated Date: Fri 08 Mar 2024 01:37:03 PM (IST)
