जेएनएन, मुंबई: अनेकजण आपल्या जोडीदाराप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी एका विशेष दिवसाची वाट पाहत असतो. आणि हे प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन वीक पेक्षा दुसरी कुठली चांगली संधी असू शकते. प्रेम व्यक्त करायचे हे तर ठरले पण, ते कसे व्यक्त करायचे हे अनेकांना कळत नाही. काहींना त्यासाठी शब्दच सुचत नाही. त्यासाठी तुम्ही कवितांचा आधार घेऊ शकता. या कवितांद्वारे तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करणे सोप्पी जाईल.
प्रेम कर भिल्लासारखं
पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तित-जास्त 12 महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं…
– कुसुमाग्रज
अशी कलत्या सांजेला तुझी आठवण येते
थरथरते पापणी मन ओलेचिंब होते
शिळ रानात वाजते
कळ काळजात येते
आठवुनी तुझा स्पर्श
अंग अंग मोहरते
जीव आणून कानात तुझी चाहुल ऐकते
थरथरते पापणी मन ओलेचिंब होत
तुझ्या सुरानी भरतो
माझ्या मनीचा अंधार
रोमरोमातून साऱ्या
जणु छेडिला गंधार
नकळत उंबऱ्याशी माझे पाऊल अडते
थरथरते पापणी मन ओलेचिंब होते
- गुरु ठाकूर
सुटतात उखाणे सारें
वळणावरी जरासे, ती वळते आणिक हसते सुटतात उखाणे सारे प्रश्नाचे उत्तर मिळते
जलतरंग ऐकु येतो अंतरात वाजे हलगी भलभलत्या उनाड शंका मग करु लागती सलगी जाळयात गुलाबी माझे मन हळूच मग गुरफटते सुटतात उखाणे सारे प्रश्नाचे उत्तर मिळते
जाणवते सूर गवसला पण चुकतो आहे ताल आशेच्या हिंदोळ्यावर होतात जिवाचे हाल अदमास तरी स्वप्नांचे, मन लावुनिया मोहरते सुटतात उखाणे सारे प्रश्नाचे उत्तर मिळते
- गुरु ठाकूर
एक मोहीनी तनामनावर तुझ्या भेटीची ओढ अनावर
शीळ वाजवी अवखळ वारा फिरे तनुवर मोर पिसारा नकळत स्मरतो स्पर्श तुझा अन् अंगांगावर ऊठे शहारा सोसेना ही विरह वेदना सवया येऊन मजला सावर तुझ्या भेटीची ओढ अनावर
एकांती मज येउन छळती चोरपावली तुझ्या चाहुली दर्पणातही बिंब दीसेना होउन गेले तुझी सावली मीटुनी डोळे स्वप्नी शिरता प्रिया तिथेही तुझाच वावर तुझ्या भेटीची ओढ अनावर
- गुरु ठाकूर
