मुंबई, जेएनएन. Parenting Tips: आपल्या जीवनातील प्रत्येक लहान मोठी गोष्ट आपण आपल्या आई-वडिलांकडून शिकत असतो, त्यातही आई आपली पहिली गुरु असते. जी आपल्याला चांगल्या वाईट ची ओळख करून देते प्रत्येक समस्येत आपल्या सोबत उभी असते. मुलांच्या आयुष्यात होणारे बदल याविषयी त्यांना जागरूक करणे हे तिचे कर्तव्य असते, जसजशी मुले मोठी होतात तसेच तसे त्यांच्या शरीरात अनेक बदल होत असतात या बदलांविषयी तुम्ही त्यांना योग्य माहिती द्यायला हवी.
मुलांना योग्य वेळी ही माहिती न दिल्यास त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्ही तिच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे काही बाबींबद्दल तिच्याशी मनमोकळेपणाने बोलायला हवे. तिच्या जीवनात होणाऱ्या बदलांविषयी तिला सज्ज करणे तुमचे कर्तव्य आहे. चला तर मग जाणून घेऊया किशोरवयीन मुलींशी तुम्ही कोणत्या विषयावर चर्चा करायला हवी.
शारीरिक बदल
मुली वयात यायला लागल्यास त्यांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यांचे स्तन विकसित होऊ लागतात ज्यामुळे मुलींच्या मानसिकतेत परिणाम होतो अशा परिस्थितीत मुलींना योग्य मार्गदर्शन करणे तुमची जबाबदारी आहे. तसेच मासिक पाळी विषयी मुलींना योग्य माहिती देणे ही आवश्यक आहे. शरीरात होणारे बदल लक्षात घेऊन आपण कशा प्रकारचे कपडे घालायला हवे याची माहिती मुलींना देणे गरजेचे आहे.
योग्य पोषण
किशोरवयीन मुलींना योग्य पोषणाची आवश्यकता असते याविषयी मुलींना माहिती द्यावी व त्यांच्या पोषण आहाराबद्दल सतर्कता बाळगावी. या वयात मुलांना फास्ट फूड, जंक फूड खाण्याची आवड असते परंतु, ते खाल्ल्याने त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो हे त्यांना समजून सांगणे महत्त्वाचे आहे. या वयात कॅलरीज, प्रथिने, लोह, कॅल्शियम, झिंक आणि फोलेटची सर्वाधिक गरज असते. त्यामुळे अशा वस्तूंचे सेवन करणे मुलींच्या आरोग्यासाठी चांगले असते.
मानसिक आरोग्य
किशोरवयीन मुलींना शरीरात होणाऱ्या बदलांसोबतच मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. या वयात बऱ्याच मुली मासिक पाळी व शरीरात होणाऱ्या बदलांमुळे चिंतीत असतात. शरीरात होणाऱ्या बदलांवर त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे त्यांना काही अडचणी असल्यास त्याचे समाधान तुम्ही करायला हवे असे न केल्यास त्या डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात.
