मुंबई, जेएनएन. Children Mental Health Updates: आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे घराकडे मुलांकडे वेळ द्यायला पालकांना जमत नाही परंतु, या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून तुम्ही मुलांसोबत वेळ घालवायला हवा. त्यासाठी मुलांशी चर्चा करा, त्यांच्यासोबत काही खेळ खेळा असे केल्याने मुलांचे मानसिक आरोग्य सुधारेल.
शारीरिक ॲक्टिव्हीटी
मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी शारीरिक ॲक्टिव्हीटी महत्वाची आहे. मुलांनी दररोज शारीरिक हालचाली करायला पाहिजे यामुळे त्याचे मानसिक आरोग्य चांगले राहील. तुम्ही स्वतः तुमच्या मुलासोबत शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होऊ शकता. यामुळे तुमच्या दोघांमधील बंध दृढ होतील आणि तुमचे मानसिक आरोग्यही सुधारेल.
मैत्रीपूर्ण संबंध
एकटे असताना मुले अनेकदा अस्वस्थ असतात. अशा परिस्थितीत तुम्ही मुलांशी मैत्रीपूर्ण संबंधांनी वागायला पाहिजे. त्यांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करायला हवा.
मुलाला घाबरवू नका
अनेक पालकांना असे वाटते की, मुलांनी आपल्याला घाबरायला हवे म्हणजे मुल लगेच आपलं म्हणणं ऐकतात. पण असे करणे चुकीचे आहे याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. मुलांना घाबरवण्याचा नाही तर समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.
