मुंबई, जेएनएन. How To Make Karanji: दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण आणि सण म्हटले की, गोड पदार्थ हमखास बनवले जातात. दिवाळीच्या फराळामध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे करंजी. तसे तर करंजी दिवाळी व्यतिरिक इतर ही सणांना बनवला जाणारा पदार्थ आहे पण, दिवाळीत या पदार्थाचे खास महत्त्व आहे. नेहमी-नेहमी तीच-तीच रव्यापासून बनवली जाणारी करंजी खाऊन तुम्ही कंटाळला आहेत का? मग या दिवाळीला आम्ही सांगितल्या प्रमाणे खोव्याची कारंजी बनवून बघा. चला तर मग जाणून घेऊया खोव्याची करंजी बनविण्याचीही सोपी पद्धती.

सामग्री:-  खोवा, रवा, तूप, पिठी साखर, तेल, मीठ, मैदा 

पद्धती:- 

  • सर्वात आधी २५० ग्रॅम मैदामध्ये गरम तेलाचे मोहन टाकून भिजवून घ्या. 
  • भिजवलेला मैदा १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. 
  • आता २५० ग्रॅम खोवा तुपात भाजून घ्या. 
  • खोवा भाजून झाला की, त्यातच रवा ही तुपात छान भाजून घ्या. 
  • रवा आणि खोव्याच्या सारणात आता वेलची पावडर, पिठी साखर, मीठ, खोबरा किस, ड्राय फ्रुटचे काप टाकून एकजीव करून घ्या. 
  • मैद्याच्या छोट्या छोट्या चपात्या लाटून 
  • त्यात साच्याच्या मदतीने सारण भरून घ्या 
  • चपातीचे पाठ पाण्याच्या मदतीने व्यवस्थित बंद करून घ्या. जेणेकरून करंजी तेलात फुटणार नाही. 
  • गरम तेलात करंजी मंद आचेवर तळून घ्या.