मुंबई, जेएनएन. How To Make Besan Ladoo: बेसन लाडू खायला कोणाला आवडत नाही. सर्वांचा आवडता पदार्थ बेसन लाडू पण, बेसन लाडू अनेकांना बनवायला अतिशय किचकट वाटतो. तर काहींना साखरेचा पाक बनवायला जमत नाही म्हणून ते बेसन लाडूच बनवत नाही. पण आज आम्ही तुम्हाला बेसन लाडू बनविण्याची अशीच काही सोपी पद्धती सांगणार आहोत ज्यात तुम्हाला पाक बनविण्याची गरज भासणार नाही. चला तर जाणून घेऊया साखरेचा पाक न बनवता कसे बनवायचे बेसनाचे लाडू.
सामग्री:- बेसन, तूप, साखर, वेलची पावडर, खोबरा किस
पद्धती:-
- बेसन तुपात ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्या.
- बेसन भाजत असताना त्यात थोडे पाणी घाला.
- आता भाजलेल्या बेसनात पिठीसाखर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या.
- या मिश्रणात वेलची पावडर आणि खोबरं किस घालून एकजीव करा.
- आता या तयार मिश्रणाचे लाडू बांधून घ्या.
