मुंबई, जेएनएन. Jewelry Tips: कुठल्याही कार्यक्रमात जाताना तुमच्या पोशाखाला माझी अशी ज्वेलरी नसेल तर तो पोशाख अपुरा वाटतो कित्येकदा आपल्याला कोणत्या ड्रेस वर कोणती मॅचिंग ज्वेलरी घालावी हे कळत नाही. अशावेळी आपण काय करायला हवे याबद्दल आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.  ज्यावरून तुम्हाला तुमच्या ड्रेस सोबत मॅचिंग ज्वेलरी निवडण्यास मदत होईल चला तर मग, जाणून घेऊया ड्रेस सोबत मॅचिंग ज्वेलरी कशी निवडावी.

टर्टल नेक

जर तुम्ही हाईट ड्रेस किंवा ब्लाऊज परिधान केले असेल तर त्यासोबत लांब ज्वेलरी घालावी. टर्टल नेटवर लॉन्ग ज्वेलरी उठून दिसते.

स्वीटहार्ट नेक

स्वीटहार्ट नेकलाइन ड्रेससह तुम्ही नाजूक लहान नेकलेस घालू शकता. स्वीटहार्ट नेकलाइनवर छोटा नेकलेस छान दिसेल.

व्ही-नेक

    व्ही-नेक ब्लाउजसह लेयर्ड चैन छान दिसतात. यासोबतच शॉर्ट लेन्थ नेकलेसही छान दिसतो. हा नेकलेस तुम्हाला खूप आकर्षक लुक देईल. व्ही नेकसह हेवी ज्वेलरी सहज परिधान करता येते.

    कॉलर नेक

    कॉलर नेकलाइन ब्लाउज खूप ट्रेंडमध्ये आहे, अनेकदा तुम्ही सेलिब्रिटींना कॉलर नेक ब्लाउज घातलेले पाहिले असेल. तुम्ही कॉलर नेक ब्लाउजसह लेयर्ड चेन, लांब नेकलेस किंवा चोकर देखील घालू शकता. 

    बोट नेक

    बोट नेक ब्लाउज सोबत चोकर खूप सुंदर दिसतो. या सोबतच मिड लेंथ किंवा लाँग नेकलेस ही छान दिसेल. 

    राउंड नेक

    राऊंड  नेक फार सामान्य आहे. बरेचदा लोक राऊंड नेक ब्लाउज घालतात, यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचा हार घालू शकता - जसे की लांब किंवा मध्यम लांबीचे चोकर 

    हॉल्टर नेक

    हॉल्टर नेक ड्रेस किंवा ब्लाउजसोबत तुम्ही Y शेप नेकलेस घालू शकता. हॉल्टर नेक ड्रेस किंवा ब्लाउज तुमचे शोल्डर आणि मानेला हायलाइट करतात, त्यामुळे Y शेप नेकलेस उठून दिसेल.