नवी दिल्ली, जेएनएन. World Labor Day 2024: जगभरातील कामगारांच्या कामाचा गौरव करण्याच्या उद्देशाने जगभरातील ८० हुन अधिक देशात जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

संपूर्ण जगभरात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर हा आहे. अनेक देश आज विविध क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहेत. या विकसनशील आणि विकसित देशांना त्यांचे लक्ष्य साध्य करून देण्यात सर्वात मोठा वाट आहे तो या कामगारांचा यांच्या सहकार्याशिवाय कोणत्याही देशाची प्रगती होणे कठीण आहे. याच कामगारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील 80 पेक्षा जास्त देश1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करतात. चला तर मग आज जागतिक कामगार दिनानिमित्त जाणून घेऊया या दिनाचा इतिहास. 

जागतिक कामगार दिवस हा 4 मे 1886 रोजी शिकागो  येथे घडलेल्या हेमार्केट घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्ष साजरा करतात. कामगारांच्या कामाचे तास हे आठ तास असावे या मागणीसाठी 1886 रोजी शिकागो येथे मोठे आंदोलन करण्यात आले होते. कामगारांच्या कामाच्या तासांसाठीची पहिली मागणी 1856 मध्ये ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या वतीने करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी 1 मे 1886 रोजी मोर्चे आणि धरणे  द्यायला सुरवात केली. आंदोलकांच्या अशाच एका मोर्चाचा सामना करताना 4 मे 1886 रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. कामगारांच्या मृत्यूचा निषेध नोंदविण्यासाठी पोलिसांच्या या क्रूरतेचा विरोध करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला. या बॉंब हल्ल्यात 1 पोलिसांचा मृत्यू झाला तर 50 पोलीस जखमी झाले.

4 मे 1886 रोजी घडलेल्या या घटनेच्या स्मरणार्थ 1 मे 1890 रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी 1989 रोजी रेमंड लेविन याने 'दुसऱ्या आंतरराष्ट्रीय'  पॅॅरीस परिषदेत केली. या परिषदेत 1 मे 1890 हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. 1891 च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली. व तेव्हापासून 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.