जेएनएन, मुंबई. Maharashtra Day 2024: महाराष्ट्र ज्याच्या राज्यात महानता आहे. अश्या या राज्यात एकूण पाच प्रदेशांचा समावेश आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या प्रदेशांचा समावेश असून राज्याची राजधानी मुंबई आहे तर उपराजधानी ही नागपूर आहे. या पाच प्रदेशा मधल्या विविध  विविधतेने हा महाराष्ट्र समृद्ध झालेला आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपण महाराष्ट्रातील अश्याच महत्वाची बाबींबद्दल जाणून घेणार आहोत.

खाद्य 

पुरण-पोळी:- महाराष्ट्रातील प्रमुख सणांना गोड पदार्थ पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पुरण पोळी हा महाराष्ट्रतील पारंपारिक पदार्थ आहे.बाकरवडी कुरकुरीत, तिखट, गोड पदार्थ आहे. प्रवासात, ऑफिस टाईम मध्ये खाण्यासारखा पदार्थ लहान मोठे सर्वांच्या जिभेवर रेंगाळतो. बाकरवडीचा शोध एका गृहिणीने लावला.  उकडीचे मोदक:- गणपतीला प्रिय असलेले मोदक तसे सर्वांच्याच आवडीचे असतात. घरातील लहान मोठ्यांना सर्वांना मोदक आवडतात.महाराष्ट्रात बनविले जाणारे उकडीचे मोदक हे खास आहेत. 

प्रसिध्द ठिकाणे 

महाराष्ट्रला समृद्ध असा नैसर्गिक परिसर लाभला असून, महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत.  यात मुंबई, पुणे- शनिवारवाडा, अजिंठा वेरूळ लेणी- औरंगाबाद, महाबळेश्वर - सातारा, चिखलदरा, ताडोबा अभयारण्य, गणपतीपुळे, त्र्यंबकेश्वर, कळसुबाई शिखर, रायगड किल्ला आहेत या ठिकाणांना भेटी देण्यासाठी दरवर्षी पर्यटक देशभरातून येत असतात.

प्रसिद्ध धार्मिक स्थळे 

    महाराष्ट्राला मोठा धार्मिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळे असून बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात जास्त आणि पाच प्रमुख ज्योतिर्लिंगे ( jyotirlinga)  महाराष्ट्रात आहेत.यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग - नाशिक, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग - बीड, भीमाशंकर ज्योतिर्लिंग -पुणे, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग -औरंगाबाद, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग-  हिंगोली ही आहेत. 

    महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलियम आणि तत्सम उद्योग हे आहेत.तर या व्यतिरिक्त धातू उत्पादने, दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत. 

    महत्त्वाची पिके- महाराष्ट्रात आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये ही प्रमुख पिके घेतली जातात. 

    महत्त्वाची नगदी पिके - महाराष्ट्रात शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू या पिकांच्या सिंचनाखालील जमीन 33,500 किमी 2 इतकी आहे.