जेएनएन, मुंबई: अश्विनी भावे ही एक सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री असून, अश्विनी भावेने आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. अश्विनीने केवळ भारतीय सिनेमाच नाही तर दूरदर्शन आणि थिएटरमध्ये सुद्धा काम केले आहे. अश्विनीने मराठीतील आहुती, अशी ही बनवा बनवी, भैरवी, पुरुष आणि आर.के.चे ब्लॉकबस्टर हेन्ना यासारख्या चित्रपटांमध्ये कामगिरी केली आहे. अश्विनी पती आणि दोन मुलांसह कॅलिफोर्नियामध्ये राहते. लीड आणि कॅरेक्टर ॲक्टर म्हणून तिने तिची अभिनयाची कारकीर्द अद्यापही सुरू ठेवली आहे.

अश्विनी भावेने 1997 साली दिग्दर्शक व्ही. मनोहर दिग्दर्शित कन्नड चित्रपट रंगेनहल्लीयेगे रांगडा रंगेगौडा या चित्रपटात भूमिका साकारली होती. अश्विनने चित्रपटांव्यतिरिक्त दूरदर्शन वरील मालिका तसेच वेब सिरीजमध्ये देखील भूमिका साकारल्या आहे. अश्विनीने मराठीतील व. पू. काळे यांच्या कादंबरीवर आधारित तसेच हिंदीतील ऐतिहासिक कादंबरीवर आधारित मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे.

अभिनेत्री अश्विनी भावेच्या गाजलेल्या चित्रपटातील भूमिका

'अशी ही बनवाबनवी'
1988 साली आलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात अश्विनीने माधुरी ही व्यक्तिरेखा साकारली होती. मराठी मनोरंजन सृष्टीत हा चित्रपट प्रचंड यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. सचिन पिळगावकर दिग्दर्शित या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगांवकर, प्रिया अरुण बेर्डे, निवेदिता जोशी सराफ, नयनतारा इत्यादी कलाकारांनी भूमिका साकारल्या असून, अशोक सराफ आणि अश्विनी भावे यांच्या भूमिकेची विशेष चर्चा झाली.

कळत- नकळत

कांचन नायक दिग्दर्शित 1989 साली प्रदर्शित झालेला कळत- नकळत या चित्रपटात सविता प्रभुणे, अश्विनी भावे, विक्रम गोखले, अशोक सराफ, सुलभा देशपांडे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात अश्विनी भावेने मनीषा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

सैनिक

हा 1993 मध्ये प्रदर्शित झालेला सैनिक या चित्रपटात देखील अश्विनी भावेची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात अक्षय कुमार, अश्विनी भावे, रोनित रॉय आणि फरहीन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात अश्विनी भावेने अलका नावाची व्यक्तिरेखा साकारली असून, अलका ही एका भारतीय सैनिकांची पत्नी असते.

जखमी दिल
1994 साली प्रदर्शित झालेल्या जखमी दिल या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावेने गायत्री नावाची मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात अश्विनने अभिनेता अक्षय कुमार सोबत स्क्रीन शेअर केली असून, जखमी दिल या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू सुब्रमण्यम यांनी केले होते. 

लवकरच झळकणार या चित्रपटात

'घरात गणपती' या चित्रपटात द बिग बुल फेम अभिनेत्री निकिता दत्त,भूषण प्रधान, आशिष पाथोडे, परी तेलंग, समीर खांडेकर, रूपेश बने, राजसी भावे, शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, अजिंक्य देव आणि अश्विनी भावे यांसारखे कलाकार आहेत.