जेएनएन, मुंबई: Aishwarya Narkar वयाच्या पन्नाशीतही तरुण अभिनेत्रींना टक्कर देणारी एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर चा जन्म 8 डिसेंबर 1974 रोजी मुंबईत झाला. अत्यंत साधेपणाने ऐश्वर्या यांचे जीवन गेले. लहानपणापासूनच ऐश्वर्या यांना अभिनयाची आवड होती. शाळेलत्या कार्यक्र्ममांमध्ये एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली. 'गंध निशिगंधाचा' हे त्यांचे पहिले नाटक होते.
साजिद शेखसोबत 'आधार' चित्रपटात जानकीच्या भूमिकेतून त्या प्रसिद्ध झाल्या. मला जगायचे, घर गृहस्थी, जुलूक, समानता, साई दर्शन..एक अनुभव या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. करण जोहर दिग्दर्शित 'धडक' चित्रपटात देखील त्या झळकल्या होत्या. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी अंकगणित आनंदाचे, तांब्याचा विष्णु बाला, होऊ दे जरासा उशीर, पिवळा, बाबांची शाळा या गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहे.
सौंदर्यात तरुण अभिनेत्रींना देतात टक्कर
ऐश्वर्या नारकरने टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ऐश्वर्या वयाच्या पन्नाशीतही त्यांच्या फिटनेसची काळजी घेतात. त्यांच्या वर्क आऊटचे फोटो आणि व्हिडीओ त्या नेहमी शेअर करत असतात. त्यांचे वर्क आऊट बघून अनेकांची जीभ दाताखाली येते. अनेक तरुणींना टक्कर देणारी ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळेही कायम चर्चेत असते. ऐश्वर्या आजच्या विशीतील तरुणी करतील त्या सर्व फॅशन कॅरी करतात. सौंदर्याच रहस्य नियमित योगासने असल्याचे त्यांनी मुलाखतींमधून बरेचदा सांगितले आहे.
ऐश्वर्या नारकर यांच्याशी अशी जुळली अविनाश यांच्याशी लग्नगाठ!
अविनाश आणि ऐश्वर्या यांनी ३ डिसेंबर रोजी त्यांचा लग्नाचा 28 वा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्या अविनाश नारकर ही जोडी देखील मराठी कलाविश्वात प्रसिद्ध आहे. या दोघांची प्रेमकहाणी सुद्धा तितकीच रंजक आहे. या जोडप्याची पहिली ओळख रंगभूमीवर एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली. अविनाश नारकर त्यावेळचे मोठे अभिनेते असल्याने ऐशवर्य त्यांच्याशी फार बोलायच्या नाही. हळूहळू सोबत काम करताना ओळख वाढत गेली आणि दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. ऐश्वर्या यांच्या माहेरी गणेश उत्सवादरम्यान भेटायला गेल्या अविनाश यांनी लग्नाआधी पल्लवी आठल्येला लग्नाची मागणी घातली. घरच्यांच्या परवानगीने दोघांनी 3 डिसेंबर 1995 ला लग्न बंधनात अडकले. अविनाश आणि ऐश्वर्या यांनी इतर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
